यावलच्या शेतकर्याची फसवणूक : केळी व्यापार्याविरुद्ध गुन्हा
यावल : यावल येथील शेतकर्याची मध्यप्रदेशातील केळी व्यापार्यांकडून दोन लाख 15 हजारात फसवणूक झाल्याने यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावल येथील केळी उत्पादक शेतकरी किशोर देवराम राणे (45, रा.महाजन गल्ली, यावल)यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. आरोपी लिलाधर प्रल्हाद पाटील (वार्ड नं. 22, सिंधीपुरा गेटजवळ, बर्हाणपूर, ह.मु.गुजरगल्ली, बहादरपुर) याने 7 डिसेंबर 2018 रोजी यावल शिवारातील फिर्यादीच्या मालकीच्या शेतगट क्रमांक 1006 व 1922 मधून दोन लाख 15 रुपये किंमतीची 181 क्विंटल 55 किलो वजन असलेली केळी विकत घेतली व त्यापोटी धनादेश दिला मात्र तो वटला नाही तर रक्कम वारंवार मागूनही न दिल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर आरोपीविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नितीन चव्हाण करीत आहेत.

