रेल्वे प्रवाशांना दिलासा : विशेष आठ रेल्वे गाड्या धावणार
आगामी सण-उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनाचा निर्णय : राज्यभरातील प्रवाशांना होणार लाभ
भुसावळ : आगामी सण-उत्सवांचे दिवस पाहता रेल्वे गाड्यांना होणारी गर्दी व प्रवाशांची गैरसोय पाहता विशेष आठ गाड्या चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. या सर्व गाड्या आरक्षित असून प्रवाशांना आरक्षण केल्यानंतरच गाडीत प्रवेश मिळणार असून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
पुणे-नागपूर-पुणे हमसफर विशेष गाडी
डाऊन 01417 पुणे-नागपूर हमसफर विशेष गाडी 15 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी प्रस्थान स्टेशन 10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी नागपूरला 1.30 वाजता पोहोचेल. या गाडीला मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 01418 नागपूर-पुणे हमसफर विशेष गाडी 16 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनहून तीन वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी पुण्यात 8.05 ला पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, भुसावळ, चाळीसगाव, मनमाड थांबा देण्यात आला आहे. 11 ऑक्टोबरपासून आरक्षण केंद्रासह संकेतस्थळावर बुकींग सुरू होणार आहे. 15 वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे असतील.

पुणे-अजनी-पुणे एसी गाडी
डाउन 02239 पुणे-अजनी एसी विशेष गाडी 17 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी प्रस्थान स्टेशनहून 10 वाजता रवाना होईल आणि दुसर्या दवशी अजनीला 1.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडभला मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, अकोला व बडनेरा येथे थांबा देण्यात आला आहे. अप 02240 अजनी-पुणे एसी विशेष गाडी 18 ऑक्टोबरपासून पुढील आदेशार्पंत दर रविवारी प्रस्थान स्टेशनवरून 7.50 वाजता रवाना होईल व दुसर्या दिवशी पुण्यात 11.45 वाजता पोहोचेल. या गाडील बडनेरा, अकोला, भुसावळ, चाळीसगाव व मनमाड येथे थांबा देण्यात आला आहे. 13 वातानुकूलित तृतीय श्रेणीचे डबे या गाडीला असतील 11 ऑक्टोबरपासून आरक्षण करता येणार आहे.
अमरावती-पुणे-अमरावती एसी विशेष गाडी
डाऊन 02117 पुणे-अमरावती एसी विशेष गाडी 14 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर बुधवारी स्थानकापासून 3.15 वाजता रवाना होवून दुसर्या दिवशी अमरावतीला 3.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला व बडनेरा येथे थांबा देण्यात आला आहे. अप 02118 अमरावती-पुणे एसी विशेष गाडी 15 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर गुरुवारी प्रस्थान स्टेशनवरून 6.35 वाजता रवाना होईल व दुसर्या दिवशी अमरावतीला 7.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडेरा, अकोला, भुसावळ, जळगाव, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 9 वातानुकूलित तृतीय श्रेणी, चचार वातानुकूलित द्वितीय श्रेणी व वातानुकूलित प्रथम श्रेणीला डबा जोडण्यात येणार असून 11 पासून बुकींग करता येणार आहे.
पुणे-अजनी-पुणे एसी विशेष गाडी
डाउन 02223 पुणे-अजनी एसी विशेष गाडी 16 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी प्रस्थान स्टेशनवरून 3.15 वाजता रवाना होइल आणि दुसर्या दिवशी अजनीला 5.15 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, भुसावळ, नांदुरा, अकोला व बडनेरा येथे थांबा देण्यात आला आहे. अप 02224 अजनी-पुणे एसी विशेष गाडी 13 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्टेशन 7.50 वाजता रवाना होून दुसर्या दिवशी पुण्यात 11.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, नांदुरा, भुसावळ व मनमाडला थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 9 वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित प्रथम श्रेणी डबा जोडण्यात येणार असून 9 पासून आरक्षण सुरू करण्यात आले आहे.
कोल्हापूर-गोंदिया-कोल्हापूर विशेष गाडी
डाऊन 01039 कोल्हापूर-गोंदिया विशेष गाडी 11 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दररोज प्रस्थान स्थानकावरून 3.20 वाजता रवाना होईल व दुसर्या दिवशी गोंदियाला 8.20 वाजता पोहोचणार आहे तर अप 01040 गोंदिया- कोल्हापूर विशेष गाडी 13 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रस्थान स्थानकावरून 8.15 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी कोल्हापूरला 12.50 वाजता पोहोचणार आहे. ही गाडी चांदुर, जलंब, पुनतांबा, जरंदेश्वर, मसूरी, सेवाग्राम, टाकारी, वलिवदे या स्टेशनवर थांबणार नाही मात्र गोंदिया-कोल्हापूर महाराष्ट्र एक्स्प्रेसला जे थांबे आहेत तेथे ही गाडी थांबणार आहे. या गाडीला नऊ वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित प्रथम श्रेणीला डबा जोडण्यात येणार असून 9 पासून बुकींग सुरू झाले आहे.
मुंबई-नांदेड-मुंबई विशेष गाडी
डाउन 01141 मुंबई-नांदेड विशेष गाडी 11 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत मुंबईहून 4.35 वाजता रवाना होवून दुसर्या दिवशी नांदेडला 5.30 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, लासगाव, मनमाड स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 01142 नांदेड-मुंबई विशेष गाडी 12 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत प्रस्थान स्थानकावरून पाच वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी मुंबईला 05.35 वाजता पोहोचेल. या गाडीला मनमाड, लासगाव, नाशिक येथे थांबा देण्यात आला असून 9 ऑक्टोबरपासून बुकींग सुरू झाले आहे.
लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार एसी विशेष गाडी
डाउन 02171 लोकमान्य टिळक टर्मिनस-हरीद्वार एसी विशेष गाडी 15 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर सोमवारी, गुरुवारी प्रस्थान स्टेशनहुन 7.55 वाजता रवाना झाल्यानंतर दुसर्या दिवशी 12.55 वाजता हरीद्वारला पोहोचेल. या गाडीला नाशिक, भुसावळ, भोपाळ, झांशी, आग्रा, हजरत निजामुद्दीन, मेरठ सिटी, टापरी, रूरकी स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 02172 हरीद्वार-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी विशेष गाडी 16 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत मंगळवार व शुक्रवारी प्रस्थान स्थानकावरून 6.30 वाजता सुटेल व दुसर्या दिवशी 11.45 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. या गाडीला भुसावळ, नाशिक येथे थांबा देण्यात आला असून 15 वातानुकूलित तृतीय श्रेणी, दोन वातानुकूलित द्वितीय श्रेणी व एक वातानुकूलित प्रथम श्रेणी डबा जोडण्यात येईल.
लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ एसी विशेष गाडी
डाउन 02121 लोकमान्य टिळक टर्मिनस-लखनऊ एसी विशेष गाडी 17 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 1.40 वाजता रवाना होवून दुसर्या दिवशी 1.45 वाजता लखनऊ स्टेशनला पोहोचणार आहे. या गाडीला नाशिक, जळगाव, भुसावळ, हबीबगंज, झांशी, ओरई, कानपूर सेंट्रल स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02122 लखनऊ-लोकमान्य टिळक टर्मिनस एसी विशेष गाडी 18 ऑक्टोबरपासून पुढील आदेशापर्यंत दर रविवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी 5.30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस स्टेशनला पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव व नाशिक येथे थांबा देण्यात आला आहे. या गाडीला 12 वातानुकूलित तृतीय श्रेणी, चार वातानुकूलित द्वितीय श्रेणी, एक वातानुकूलित प्रथम श्रेणी डबा जोडण्यात येणार आहे. दोन्ही गाड्यांचे 11 ऑक्टोबरपासून आरक्षण सुरू होणार आहे.

