भुसावळात पोलिसांची वॉश आऊट मोहिम


 

भुसावळ ः शहरातील खडका रोडसह आठवडे बाजारात गुन्हे शाखेच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी धाड टाकत पाच हजार 480 रुपयांच्या रोकडसह सट्टा, जुगाराचे साहित्य जप्त केले. विश्वनाथ पवार (रा. कोळी वाडा, वांजोळारोड, भुसावळ), गजानन दगडू चौधरी व गोपाळ द्वारकादास अग्रवाल (रा. शनि मंदीर वॉर्ड, भुसावळ) यांच्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला तर खडका रोडवरील मन्नत कॉम्प्लेक्सजवळ मोहंमद रफिक शेख गुलाब (रा. इकरा मदरशाजवळ, जाम मोहल्ला, भुसावळ) याच्या ताब्यातून सट्टा जुगाराचे साहित्य तसेच 760 रुपये जप्त करण्यात आले. टीव्ही टॉवर भागातून तुषार प्रल्हाद बर्‍हाटे (रा. कोलते गल्ली, भुसावळ) यांच्या ताब्यातून एएक हजार 430 रुपये आणि सट्टा जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले तसेच प्रोफेसर कॉलनीत सुभाष नामदेव वारके यांच्याकडून सट्टा लावण्याचे साहित्य तसेच एक हजार 660 रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. शहरातील जामनेर रोडवरील कृष्णा नगरातून 728 रूपये किंमतीच्या 14 देशी दारूच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या. केल्यात. सर्व कारवाईतील आरोपींची जामिनावर सुटका करण्यात आली. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेसह स्थानिक बाजारपेठ पोलिसांनी ही कारवाई केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !