भुसावळात तरुणाचा डोक्यात रॉड टाकून खून
भुसावळ : शहरातील तरुणाचा डोक्यात लोखंडी रॉड टाकून खून करण्यात आल्याची घटना रविवारी रात्री उशिरा घडली. मो.शेख जाकीर (पंचशीलशील नगर, भुसावळ) असे मयताचे नाव आहे. चार ते पाच संशयीतांनी मो.शेख जाकीर यांच्या डोक्यावर लोखंडी रॉडने हल्ला केल्याने अत्यवस्थ अवस्थेत त्यांना खाजगी दवाखान्यात हलवले असता त्यास मयत घोषित करण्यात आले. या प्रकारानंतर भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे. रात्री उशिरापर्यंत शहरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला तर काही संशयीतांना मध्यरात्री ताब्यात घेण्यात आल्याचे समजते. शहरात वारंवार अप्रिय घटना घडत असल्याने भुसावळातील गुन्हेगारी पुन्हा चर्चेत आली आहे.

