भुसावळात पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने 40 हजारांचे दागिने लांबवले
भुसावळ : शहरातील जामनेर रोडवरील अनिल हॉटेल जवळ एका महिन्याच्या अंगावरील दागिने पॉलिश करून देतो आणि चांगले उजळून देतो असे सांगत एका भामट्याने 46 हजार आठशे रुपये किमतीचे महिलेच्या अंगावरील दागिने लांबवल्याची घटना शुक्रवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. जामनेर रोडवरील हॉटेल नांदेड सुनंदा भास्कर आंबेकर या बद्री प्लॉटमधील महिला त्यांची एका अनोळखी व्यक्तीशी भेट झाली त्या व्यक्तीने तुमच्या अंगावरील सोन्याचे दागिने पॉलिश करून चांगले उजळून देतो अशी भुरळ घातली. यावेळी कानातील टॉप्स गळ्यातील चेन आधी सोन्याचे दागिने महिलेने त्या व्यक्तीचा पॉलिश करायला दिले. मी तत्काळ पॉलिश करून देतो असे सांगत त्या व्यक्तीने हे दागिने घेऊन पोबारा केला, तो पुन्हा आलाच नाही आपली फसवणूक झाल्याचे महिलेच्या लक्षात आल्यावर सुनंदा भास्कर आंबेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. हवालदार मिलिंद कंक तपास करीत आहेत.

