अंगावर वीज कोसळल्याने चिखलीच्या शेतकर्याचा मृत्यू
मुक्ताईनगर : अंगावर वीज पडल्याने तालुक्यातील चिखली येथील 45 वर्षीय शेतकर्याचा मृत्यू झाला. सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील दुधलगाव शिवारात ही घटना घडली. प्रमोद देवचंद खोंडले असे मयत शेतकर्याचे नाव आहे. शेतकरी खोंडले हे दुधलगाव शिवारातील शेतात काम करीत असतानाच वादळी वार्यासह पावसाला सुरुवात झाली व त्यातच अचानक अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. मलकापूर तहसीलदार यांनी तत्काळ घटनेचा पंचनामा करण्याच्या सूचना तलाठी व सर्कल यांना दिल्या.

