सांगवी शिवारातून 30 क्विंटल ज्वारी लांबवली
यावल : तालुक्यातील सांगवी शिवारातील शेतातुन 30 क्विंटल वजनाची व 33 हजार रुपये किंमतीची ज्वारी लांबवण्यात आल्याची घटना बुधवारी घडली. या प्रकरणी संतोष अरुण जवरे (रा.पिळोदा बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अरुण पंढरीनाथ धांडे (रा.सांगवी खुर्द) व रसुल निजाम तडवी (रा.बोरखेडा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. जवरे यांच्या तक्रारीनुसार सांगवी शिवारातील डॉ. निलेश महाजन भुसावळ यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 337 कसतात. यंदाच्या खीप हंगामात ज्वारीचे पीक पेरले व शेतात मळणी यंत्र आणून तयार केले. एकूण 30 क्विंटल ज्वारी शेतात असल्याची संधी चोरट्यांनी साधली. आरोपींनी 7 व व 8 ऑक्टोंबरच्या पहाटे लांबवल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार कैलास चव्हाण करीत आहेत.

