जळगाव जिल्ह्यात कोरोनाचे 91 रुग्ण आढळले


जिल्ह्यातील बाधीतांची संख्या पोहोचली 51 हजार 304 वर : पाच महिन्यात प्रथमच एकाही रुग्णाचा मृत्यू नाही

जळगाव : जिल्हावासीयांसाठी पाच महिन्यानंतर प्रथमच मंगळवार दिलासा देणारा वार ठरला. मंगळवारच्या अहवालात 91 रुग्ण बाधीत आढळले असलेतरी एकाही रुग्णाचा 24 तासात मृत्यू झाला नसल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. आतापर्यंत कोरोनामुळे 1230 रुग्णांचा मृत्यू ओढवला आहे तर जिल्ह्यातील 51 हजार 304 रुग्णांना कोरोनाची लागण झाली असून त्यातील 47 हजार 626 रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर मंगळवारी एकाच दिवसात 230 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

मंगळवारी या शहरात आढळले बाधीत
जळगाव शहर 12
जळगाव ग्रामीण 03
भुसावळ 16
अमळनेर 09
चोपडा 05
पाचोरा 02
भडगाव 04
धरणगाव 05
यावल 02
एरंडोल 00
जामनेर 08
रावेर 03
पारोळा 01
चाळीसगाव 15
मुक्ताईनगर 03
बोदवड 01
अन्य जिल्हा 02




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !