निंबोल-नांदुरखेडा गावानजीकचे शेती-शिव रस्ते मोकळे करण्यास सुरुवात
महाराजस्व अभियान : शेतकर्यांनी व्यक्त केले समाधान
रावेर : महसूल प्रशासनातर्फे महाराजस्व अभियानांतर्गत मंगळवारी निंबोल-नांदुरखेडा गावानजीकचे शेती-शिव रस्ते तहसीलदार उषाराणी देवगुणे निवासी नायब तहसीलदार संजय तायडे यांच्या उपस्थितीत मोकळे करण्याची कारवाई सुरू करण्यात आल्याने परीसरातील शेतकर्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
शेतकर्यांच्या तक्रारीची दखल
निंबोल व नांदुरखेडा या गावांच्या शेतकर्यांनी शिव रस्ते मोकळे करण्यासाठी अर्ज केला होता.त्याची दखल घेत महाराजस्व अभियाना अंतर्गत मंगळवारीतहसीलदार उषाराणी देवगुणे व निवासी नायब तहसीलदार संजय तायडे स्पॉटवर जाऊन लोकसहभागातून मंगळवारी निंबोल-नांदूरखेडा शिवरस्ते मोकळे करण्याची करवाई सुरू केली. यावेळी महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी टोंगळे, तलाठी किर्ती कदम, निलेश चौधरी, अव्वल कारकुन मनोज लडके, लिपिक प्रवीण पाटील यांची देखील उपस्थिती होती.

या शेतकर्यांची उपस्थिती
यावेळी संजय महाजन, कडू पाटील, चंद्रकांत पाटील, भागवत पाटील, प्रभाकर पाटील, गोपाळ पाटील, संजय पाटील, दत्तू पाटील, विजय पाटील यांच्या सह निंबोल व नांदूरखेडा येथील शिव रस्त्याला शेती असलेले शेतकरी मोठ्या संखेने उपस्थित होते.
तहसीलदार निघाल्या पायी
नांदुरखेडा व निंबोल शेती शिव रस्ता मोकळा करण्यासाठी रावेर तहसीलदार स्पॉटवर पोहचल्यानंतर संपूर्ण रस्ता बघण्यासाठी दोन्ही बाजूच्या शेतकर्यांच्या समस्या ऐकून तब्बल तीन किलोमीटर उषाराणी देवगुणे पायी चालत गेल्या व संपूर्ण रस्ता बघुन शेतकर्यांमध्ये समन्वय घडून लोक सहभागातून मोकळा करण्याची कारवाई सुरू झाली. अनेक वर्षापासून प्रलंबित शेती शिव रस्ता मोकळा होतांना पाहून शेतकर्यांनी समाधान व्यक्त केले.

