अल्पवयीन तरुणीला पळवणारा आरोपी बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात
भुसावळ : अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्यात अल्पवयीन मुलीला पळवल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यातील आरोपी भुसावळात असल्याची माहिती सहाय्यक फौजदार सुरेश डबरे यांनी बाजारपेठ पोलिसांना बुधवारी कळवली होती त्यावरून आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विशाल जितेंद्र जावळे (23, रा.जामनेर रोड, वाल्मीक नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस उपअधीखक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला, नाईक रवींद्र बिर्हाडे, कृष्णा देशमुख, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, कॉन्स्टेबल विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे आदींच्या पथकाने केली. आरोपी बुधवारी शहरातील टिंबर मार्केट परीसरातून अटक करण्यात आली. आरोपीला अमरावती शहरातील नागपुरी गेट पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार सुरेश डबरे, नाईक अकिल खान यांच्या ताब्यात देण्यात आले.


