यावलमध्ये बालिकेचा विनयभंग : शिक्षकाविरुद्ध गुन्हा


यावल : शहरातील सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेचा खाजगी शिकवणी घेणार्‍या एका 32 वर्षीय शिक्षकाने विनयभंग केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. मुलगी शिकवणीवरून घरी गेल्यानंतर तिने आपल्या पालकांना हा प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसात 32 वर्षीय शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. शहरातील आयेशा नगर भागात सईद बेग गुलाब बेग मिर्झा (32, रा.डांगपुरा, यावल) हा खाजगी शिकवणी घेणार्‍या शिक्षकाने मंगळवारी सायंकाळी सहा ते सात या वेळेमध्ये सर्व मुलांना सुट्टी दिली व सहा वर्षीय अल्पवयीन बालिकेला थांबवून ठेवलं. बालिका घरी न आल्याने माहिती घेण्याकरीता तिच्या आईने तिच्या अल्पवयीन भावास शोध घेण्यासाठी पाठवले असता सदर शिक्षक हा त्या मुलीसोबत अश्लील चाळे करताना आढळला. त्यानंतर त्या मुलीला घेऊन त्या बालिकेचा लहान भाऊ हा घरी पोहोचला घरी पोहोचल्यावर बालिकेने घडलेली घटना आपल्या पालकांना सांगितली तेव्हा संतप्त झालेल्या पालकांनी व जमावाने शिक्षकाला चांगलाच चोप दिला व पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी पोलिसात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सुनीता कोळपकर, सहायक फौजदार नेताजी वंजारी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !