जबलपूर-कोईम्बतुर दरम्यान विशेष गाडी


भुसावळ : आगामी सण-उत्सवामुळे प्रवाशांची होणारी गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने विशेष गाड्या धावण्याचा निर्णय घेतला आहे.

जबलपुर-कोइम्बतुर विशेष गाडी
अप 02198 जबलपूर-कोइम्बतुर विशेष गाडी 24 ऑक्टोबर ते 28 नोव्हेंबरदरम्यान दर शनिवारी प्रस्थान स्टेशनवरून 11 वाजता सुटेल व तिसर्‍या दिवशी कोईम्बतुरला 4.40 वाजता पोहोचणार आहे. डाऊन 02197 कोइम्बतूर-जबलपूर विशेष गाडी 26 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबरदरम्यान दर सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 3.30 प्रस्थान झाल्यानंतर तिसर्‍या दिवशी जबलपूरला आठ वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ, नाशिक, पनवेल, रोहा, खेड, चिपळून, रत्नागिरी, कनकवली, कुदाल, थिवम, मडगांव, कारवार, कुमता, ब्यन्दूर, कुन्दपुरा, उडापी, मुल्की, मंगलोर, कसारागोड, कन्हान्गद, पय्युर, कन्नूर, तेलिचेरी, वदकारा, कोजीकोड, तिरुर, शोरंर्जुन पलघाट रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक एसी टू टायर, पाच एसी थ्री टायर, 9 स्लीपर क्लास डबे जोडण्यात येणार आहेत. केवळ आरक्षित तिकीट असलेल्या प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करण्याची परवानगी असणार असून कोरोना नियमांचेही प्रवाशांना पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !