ग्रंथालय अनुदानात वाढ करा : मुन्वर खान
भुसावळ : स्व.राजीव गांधी वाचनालय ग्रंथालय भुसावळतर्फे सार्वजनिक ग्रंथालयांच्या अनुदानात वाढ करण्यासह अन्य मागण्यांसाठी उच्च व तांत्रिक शिक्षण मंत्री उदय सावंत यांना पाठवण्यात आले आहे. निवेदनाचा आशय असा की, गेल्या दहा वर्षांपासून अनुदान वाढविण्यात आलेले नाही त्यामुळे दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली शिवाय स्थानिक नायब तहसीलदार इंगळे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी स्व.राजीव गांधी वाचनालय ग्रंथालयाचे अध्यक्ष व जळगाव जिल्हा काँग्रेस कमेटी अल्पसंख्यांक विभागाचे जिल्हाध्यक्ष मो.मुन्वर खान, सार्वजनिक वाचनालयाचे नितीन तोडकर, मुस्लीम लायब्ररीचे आरीफ शेख, सार्वजनिक वाचनालयाचे सहाय्यक अवधूत आदी उपस्थित होते.

