लोहमार्गचा बेपत्ता कर्मचारी सापडला बर्‍हाणपूरला


भुसावळ : भुसावळ लोहमार्ग पोलिस ठाण्यातील कर्मचारी जय कुमार कोळी हे 17 ऑक्टोबर रोजीे बेपत्ता झाले होते. याबाबत पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी त्यांचा शोध घेतला असता जयकुमार कोळी हे बर्‍हाणपूर येथे एका हॉस्पिटलमध्ये पोलिसांना मिळून आले. पोलिसांनी कोळी यास ताब्यात घेत त्यांच्या भावाच्या स्वाधीन केले असल्याची माहिती जीआरपी पोलिस सूत्रांनी दिली. पोलिस कर्मचारी कोळी बेपत्ता झाल्याने पोलिस ठाण्यात खळबळ उडाली होती. मात्र गुरुवारी ते सापडल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !