भुसावळ पालिकेने सक्तीची कर वसुली थांबवावी


नगरविकास राज्यमंत्र्यांकडे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांची मागणी

भुसावळ : भुसावळ नगरपालिकेकडून सक्तीची होणारी कर वसुली थांबवावी, अशी मागणी गुरुवारी नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे यांनी केली. निवेदनाचा आशय असा की, कोरोनाच्या काळात अनेकांच्या हाताला काम नाही त्यातच कोरोनामुळे अनेक नागरीकांचा मृत्यू ओढवल्याने कुटुंबीयांवर दुःखाचे सावट असताना त्यांना नगरपालिकेकडून मृत्यू दाखला, जन्म दाखला, विवाह नोंदणी अशा दाखल्याची आवश्यकता असताना नगरपालिकेत अर्ज केल्यानंतर मार्च 2021 पर्यंत कर भरण्याची मागणी केली जात आहे.

भुसावळ पालिकेकडून सुविधांची बोंब
नेमाडे यांच्या निवेदनानुसार, नागरीकांना गेल्या चार वर्षापासून कोणत्याही दैनंदिन सुविधा प्राप्त झालेल्या नाहीत. रस्ते, गटारी, हायमास्ट दिवे तसेच 10 ते 12 दिवसांनी मिळणारे पाणी आदी असुविधांमुळे नागरीक त्रस्त झाले आहेत शिवाय शहरातील जागोजागी कचर्‍याचे ढीग साचल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. नगरविकास राज्यमंत्र्यांनी निवेदनाची लागलीच दखल घेत भुसावळ मुख्याधिकारी संदीप चिद्रवार यांच्याशी संपर्क साधत त्यांना सूचना केल्याचे नेमाडे यांनी कळवले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !