माजी मंत्री एकनाथराव खडसेंचा थोड्याच वेळात राष्ट्रवादी प्रवेश


मुंबई : माजी मंत्री एकनाथराव खडसे थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून त्यांच्यासोबत खान्देशातून शेकडो कार्यकर्ते मुंबईत दाखल झाले आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करीत असून पक्ष प्रवेशासाठी मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयासमोर मोठी गर्दी झाली आहे.

यांचीदेखील सोहळ्यासाठी उपस्थिती
खडसे यांच्या पक्ष प्रवेश सोहळ्याला ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल, खासदार सुनील तटकरे, खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ नेते आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ, कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख, अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, सतीश पाटील आदींसह जळगाव जिल्ह्यातील नेते उपस्थित राहणार आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !