भुसावळात डॉक्टरांना खंडणी मागितली : एका आरोपीला अटक


भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी : अन्य पसार आरोपींचा कसून शोध

भुसावळ : भुसावळातील डॉक्टरांना चाकूचा धाक दाखवून 50 हजार रुपये प्रति महिना खंडणीची मागणी चौघा आरोपींनी केली होती. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील एका आरोपीला अटक करण्यात बााजारपेठ पोलिसांना शुक्रवारी यश आले आहे. संदीप बुधा खंडारे (22, इंद्रानगर, जामनेर रोड, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

डॉक्टरांना मागितली होती खंडणी
जामनेर रोडवरील कोळंबे रुग्णालयाचे डॉ.स्वप्नील राजाराम कोळंबे (38, रा.इंडीयन ऑईल पेट्रोल पंपाच्या बाजुला, जामनेर रोड भुसावळ) यांना चौघा आरोपींना प्रती महिना 50 हजारांची खंडणी मागण्यासाठी तगादा लावला होता शिवाय रक्कम न दिल्यास जीवे ठार मारण्याची धमकी चाकूचा धाक दाखवून देण्यात आली होती. आरोपी संदीप खंडारे हा शुक्रवारी भुसावळ शहरातील नाहाटा कॉलेजवळील पाण्याच्या टाकीजवळ आल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यास अटक करण्यात आली.

यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला, एएसआय तस्लीम पठाण, नाईक रवींद्र बिर्‍हाडे, कृष्णा देशमुख, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, समाधान पाटील, विकास सातदिवे, ईश्वर भालेराव, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, सचिन चौधरी, योगेश माळी, सुभाष साबळे आदींनी आरोपीला अटक केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !