दागिने उजळण्यास नकार : महिलेवर अॅसीड हल्ला
साक्री : दागिने उजळून देण्यास नकार दिल्याने संतप्त तरुणाने महिलेवर अॅसिड फेकल्याची घटना तालुक्यातील रायपूर येथे शुक्रवारी घडली. या घटनेत विवाहिता सुनंदाबाई दगडू कोरडकर या जखमी झाल्या असून त्यांच्या तक्रारीनुसार आरोपी मिथुनकुमार धनसिंग शहा (26, रा.भागलपूर, बिहार) या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून त्यास अटक करण्यात आली. चांदीचे दागिने उजळून देतो, असे आरोपीने सांगितले असता सुनंदाबाई यांनी नकार दिल्यानंतर आरोपीने त्यांच्यावर अॅसीड फेकले. रायपूर गावाजवळील एका शेतात ही घटना घडली.

