मोबाईल चोरीच्या गुन्ह्यातील पसार आरोपीला अटक
भुसावळ : नाशिक लोहमार्ग पोलिसांना चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड असलेल्या आरोपीच्या बाजारपेठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. रईस अहमद नबी अहमद (29, रा.गौसिया नगर, भुसावळ) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे. एक वर्ष तीन महिन्यांपासून आरोपी पोलिसांना चकमा देत असल्याचे सांगण्यात आले.
भुसावळात गोपनीय माहितीवरून अटक
16 जुलै रोजी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास तक्रारदार सचिन मानसिंग पाटील (27, रा.खडके सिंग, ता.एरंडोल) यांचा आरोपी रईस अहमदने मोबाईल लांबवल्याप्रकरणी नाशिक रोड लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी 23 रोजी रात्री 11 वाजता शहराील रजा टॉवर भागात आल्याची माहिती मिळाल्यानंतरत्यास अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपीच्या मुसक्या
ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक प्रवीण मुंढे, अपर पोलिस अधीक्षक चंद्रकांत गवळी, उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस निरीक्षक् दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.निरीक्षक अनिल मोरे, सहा.निरीक्षक मंगेश गोटला एएसआय तस्लीम पठाण, नाईक रवींद्र बिर्हाडे, कृष्णा देशमुख, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, विकास सातदिवे, प्रशांत चव्हाण, सचिन चौधरी, प्रशांत परदेशी, चेतन ढाकणे, ईश्वर भालेराव, सुभाष साबळे, बंटी कापडणे आदींनी केली. आरोपीला नाशिक लोहमार्गचे योगेश साळेकर व सावजी यांच्या ताब्यात देण्यात आले.

