वरणगावातही माजी मंत्री एकनाथराव खडसे यांचे जंगी स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस आणि नाथाभाऊ आगे बढोच्या घोषणांनी दणाणला परीसर
वरणगाव : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वेसर्वा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्यावर विश्वास ठेऊन भारतीय जनता पार्टीला रामराम करीत माजी मंत्री एकनाथरावजी खडसे साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केला. प्रवेशानंतर मुंबईहून वरणगावमार्के मुक्ताईनगर येथे नाथाभाऊ जात असताना रविवारी सकाळी 11 वाजता बस स्थानक चौकात फटाक्यांच्या आतषबाजीत नाथाभाऊंचे जंगी स्वागत करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी वरणगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हा सरचिटणीस राजेंद्र चौधरी, तालुकाध्यक्ष दीपक मराठे, वरणगाव शहराध्यक्ष संतोष माळी, माजी नगरसेवक विष्णू खोले, गणेश चौधरी, रवींद्र सोनवणे, समाधान चौधरी, प्रकाश नारखेडे, माजी उपसरपंच साजिद कुरेशी, पप्पू जकातदार, चढा शेठ, राजेश चौधरी, गजानन वंजारी, युवक जिल्हा उपाध्यक्ष वाय.आर.पाटील सर, प्रशांत मोरे, मनोज कोलते, सोहेल कुरेशी, अनिल चौधरी यांच्यातर्फे नाथाभाऊंचे पुष्पहार घालून फुलांचे बुके देऊन फटाक्याच्ंया आतषबाजीत स्वागत करण्यात आले.
घोषणांनी दणाणला परीसर
याप्रसंगी भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये आलेले माजी तालुकाध्यक्ष सुधाकर जावळे, माजी नगरसेवक बबलू माळी, सरपंच प्रशांत पाटील, माजी नगरसेविका अरुणा इंगळे, रोहिणी जावळे, जागृती बढे, दूध संचालिका शामल झांबरे, गुड्डू बढे, राजेश इंगळे, इफ्ताहर मिर्जा आदी उपस्थित होते. यावेळी शरदचंद्रजी पवार साहेब आगे बढो… नाथाभाऊ आगे बढो… राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो अश्या घोषणा देण्यात आल्या.
चोरट्यांनी दाखवली हात की सफाई
स्वागताच्या कार्यक्रमादरम्यान चोरट्यांनी आपली हात की सफाई दाखवत अनेकांच्या खिशातील रोख रखमेसह पाकिटावर डल्ला मारल्याचे सांगण्यात आले.

