बनावट सोन्याचे मणी देत यावलच्या सेवानिवृत्त प्राध्यापकाची सात लाखात फसवणूक
यावल : शहरातील एका सेवानिवृत्त प्राध्यापकाची दोघा अज्ञात भामट्यांनी सोन्याचे नकली मनी देवून सात लाख रुपयांमध्ये फसवणूक केल्याची घटना घडली नुकतीच घडली. या फसवणुकीच्या प्रकाराची शहरात सर्वत्र एकच चर्चा आहे. यावल शहरातील विस्तारीत वसाहतीमधील विरार नगर परीसरात राहणारे सेवानिवृत्त प्रा.एस.डी.पाटील यांच्याकडे 24 ऑक्टोबर रोजी दोन अज्ञात भामटे आले व त्यांनी आम्ही राजस्थानचे रहिवासी असल्याचे सांगत आम्हास एका ठिकाणी कामात खोदकामात एक किलो सोन्याचे दागिने सापडल्याचे सांगत आम्ही त्याचे मणी बनवले असून 60 लाखांचे हे दागिने केवळ सात लाख रुपये किंमतीत देत असल्याने पाटील यांनी भामट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व दागिने खरेदी केले. नंतर या दागिण्यांची खातरजमा केली असता ते नकली असल्याचे उघड झाल्यानंतर तक्रारदाराने पोलिसात धाव घेतली व गुन्हा दाखल करण्यात आला. यावलचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी अशा प्रकारे आमीष दाखवुन फसगत करणार्या भामट्यांपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे.

