कोल्हाडीतील मुक्ताई एन्टरप्रायझेसचा स्फोटक परवाना रद्द
जिल्हाधिकार्यांच्या आदेशाने उडाली खळबळ : शिवसेनेने केली होती तक्रार
बोदवड : तालुक्यातील कोल्हाडी गावात नियम डावलत खुलेआम (ब्लास्टिंग मटेरीयल) स्फोटक पदार्थांचा व्यापार नागरी वस्तीमधून सुरू असल्याची तक्रार शेतकर्यांसह शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख सुनील पाटील यांनी 19 ोजी केली होती. जिल्हाधिकार्यांनी तक्रारीची गांभीर्याने दखल घेत मुक्ताई एंटरप्रायझेसचा स्फोटक परवाना रद्द केला आहे.
अटी व शर्तीची पूर्तता न केल्याने परवाना ररद्द
मुक्ताई एन्टरप्रायझेसतर्फे अतुल राणे (रा.विद्यानगर, बोदवड) यांना जिल्हाधिकारी कार्यालयाकडून दिनांक 16 ऑगस्ट 2012 रोजी निर्गमित करण्यात आलेले नाहरकत प्रमाणपत्र अटी व शर्तीची पूर्तता न केल्यामुळे रद्द करण्यात आले आहे. ना हरकत प्रमाणपत्र नमूद केल्यानुसार रस्त्याच्या हद्दीपासून रस्त्यास समांतर असा बारा मीटर रुंदीचा सेवा मार्ग ठेवण्यात आला पाहिजे होतो मात्र स्थळ निरीक्षण नकाशात दर्शविल्याप्रमाणे गट क्रमांक 47 च्या ऊत्तरेस कोल्हाडी-निमखेड रस्ता तर दक्षिणेस कोल्हाडी-चिंचखेडसीम शिवरस्ता असून या रस्त्यांना जोडणारा व स्फोटक गोडाउन समोर जाणारा मुरुमाचा कच्चा रस्ता अंदाजे 10 ते 12 फूट रुंदीचा दिसून येतो. या जागेवर अकृषक वापर करण्यापूर्वी मुक्ताई एंटरप्रायझेसचे अतुल राणे यांनी सक्षम प्राधिकारी यांच्याकडून वाणिज्य प्रयोजनार्थ बिनशेती परवानगी घेणे आवश्यक होते तसेच नियोजन प्राधिकरणाकडून बांधकाम परवानगी घेणे आवश्यक होते परंतु संबंधितांनी अटी-शर्तीची पुर्तता केली गेली नसल्याने परवाना रद्दचे आदेश जिल्हा दंडाधिकारी यांनी काढले आहे. न्यायालयीन कामकाज अॅड.विनोद सुशीर (धनगर) यांनी पाहिले.

