भिलपुरा परीसरात सट्टा जुगाराच्या अड्डयावर शनिपेठ पोलिसांचा छापा
दोन संशयितांना रोकड, साहित्यांसह अटक : शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
जळगाव : शहरातील घाणेकर चौक ते भिलपूरा चौकीदरम्यानच्या रस्त्यावर नूर बॅण्डजवळ सुरु असलेल्या सट्टा जुगाराच्या अड्डयावर सोमवारी छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी शैलेश सुरेश सुरळकर (38, रा. जोशीपेठ) व शरद भगवान चौधरी (55, रा.मेस्कोमाता नगर) या दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून 1230 रुपयांची रोकड तसेच सट्टा जुगाराचे साहित्य असा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. शनिपेठ पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांना भिलपुरा परीसरात दोन जण सट्टा जुगाराचा खेळ खेळत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस हेड कॉस्टेबल दिनेशसिंग पाटील, पोलीस नाईक अभिजित सैंदाणे, पोलीस कॉन्स्टेबल किरण वानखेडे, राहूल पाटील यांच्या पथकाला कारवाईच्या सुचना केल्या. पथकाने सोमवारी सकाळी 10.15 नूर बॅन्डच्या बाजूला गल्लीत भिंतीच्या आडोश्याला सुरु असलेल्या सट्टा जुगाराच्या खेळावर छापा टाकला. तसेच शैलेश सुरळकर व शरद चौधरी या दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्या अंगझडतीत 1250 रुपयांची रोडक तसेच घटनास्थळावर मिळून आलेले सट्ट्याचे साहित्य असा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल राहूल पाटील यांच्या फिर्यादीवरुन शैलेश सुरळकर व शरद चौधरी या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास दिनेशसिंग पाटील, अमोल विसपुते, अश्विन हडपे करीत आहेत.

