दिव्यांग बांधवांना पाच टक्के निधी द्या
फैजपूरात नगरपालिका व प्रांताधिकारी प्रशासनाला निवेदन
फैजपूर : दिव्यांग बांधवांना नगरपालिकेच्या उत्पन्नातून पाच टक्के कल्याणकारी निधी द्यावा यासह अन्य मागण्यांसाठी फैजपूर नगरपालिका व प्रांताधिकारी प्रशासनाला फैजपूर दिव्यांग सेना आणि लोणार सरोवर अपंग विकास सेवाभावी संस्थेतर्फे मंगळवारी निवेदन देण्यात आले. दिव्यांग सेना जिल्हाध्यक्ष अक्षय महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले.
यांची होती उपस्थिती
फैजपूर दिव्यांग सेना शहराध्यक्ष नितीन महाजन यांच्या नेतृत्वात मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, नगरपालिकेच्या स्वउत्पन्नातून दिव्यांग बांधवांना कल्याणकारी पाच टक्के निधी द्यावा, व्यवसायासाठी व्यापारी संकुलात गाळा, घरपट्टी व पाणीपट्टीमध्ये 50 टक्के सवलत मिळावी व प्रांताधिकारी कार्यालयात महेश साळुंके यांना शासनाचे अंत्योदय रेशन कार्ड योजनेत शासकीय नियमानुसार समाविष्ट करून दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ मिळावा आदी मागण्या करण्यात आल्या. मागण्यांचा नोव्हेंबरपर्यंत विचार करण्यात यावा अन्यथा डिसेंबर 2020 मध्ये दिव्यांग बांधव नगर पालिकेसमोर आमरण उपोषण करतील., असा इशारा देण्यात आला. दिव्यांग सेना फैजपूर शहराध्यक्ष नितीन महाजन, उपाध्यक्ष ललित वाघूळदे, उपाध्यक्ष नाना मोची, सचिव मुन्ना चौधरी, सामाजिक कार्यकर्ते राहुल कोल्हे, लोणार सरोवर अपंग विकास संस्थाध्यक्ष अयसान कुरेशी, रोहित तायडे, आमीनाबी तांबट, शे.रीयाज, शे.रईस, मो.वशिम, शे.अय्युब, अल्ताफ, दिव्यांग बांधव उपस्थित होते.

