भुसावळात भाजपाची उद्या महत्वपूर्ण बैठक


भुसावळ : भारतीय जनता पार्टीची भुसावळ विधानसभा मतदारसंघाची महत्वपूर्ण विस्तृत बैठक गुरुवारी सायंकाळी सहा वाजता शहरातील जळगाव रोडवरील लोणारी समाज मंगल कार्यालयात होत आहे. प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणिक विभागीय संघटनमंत्री रवींद्र अनासपुरे, माजी मंत्री गिरीश महाजन, जिल्हाध्यक्ष राजू मामा भोळे, प्रदेश चिटणीस खासदार रक्षा खडसे,
आमदार सावकारे, उत्तर महाराष्ट्र संघटनमंत्री किशोर काळकर, सरचिटणीस विजय धांडे, लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे, माजी नगराध्यक्ष सुनील काळे आदींची उपस्थिती बैठकीला राहणार आहे.

पदाधिकार्‍यांना उपस्थितीचे आवाहन 
या बैठकीला भुसावळ मतदारसंघातील लोकप्रतिनिधी, भाजपा पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते, युवा मोर्चा पदाधिकारी, जिल्हा परीषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक, शक्ती केंद्र प्रमुख, बुथ प्रमुख, विविध आघाड्यांचे अध्यक्ष, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सदस्य यांनी बैठकीला उपस्थिती द्यावी, असे आवाहन भाजपा शहर सरचिटणीस पवन बुंदेले आणि अमोल महाजन तसेच भाजपा तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, सरचिटणीस दिलीप कोळी आदींनी केले आहे.

बैठकीतील चर्चेकडे लागले लक्ष
40 वर्ष भाजपा पक्ष वाढीसाठी खस्ता खाल्लेल माजी मंत्री खडसे यांनी भाजपाला रामराम केल्यानंतर राष्ट्रवादी प्रवेशावेळी भाजपाप्रमाणेच राष्ट्रवादी वाढवून दाखवेल, अशी ग्वाही सुप्रीमो शरद पवार यांच्याकडे दिली होती त्यामुळे भाजपाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता आहे. या पार्श्‍वभूमीवर गुरुवारी होणार्‍या बैठकीत नेमके काय मंथन होते? याकडे लक्ष लागले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !