राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख रविवारी जळगाव जिल्हा दौर्‍यावर


जळगाव : राज्याचे गृह मंत्री अनिल देशमुख हे जळगाव जिल्हा दौर्‍यावर रविवार, 1 नोव्हेंबर 2020 रोजी येत आहेत. दुपारी 13.30 वाजता शहादा येथून हेलीकॉप्टरने अमळनेरकडे प्रयाणक ते करतील व दुपारी 2.15 वाजता अमळनेर हॅलीपॅड येथे आगमन व आमदार अनिल भाईदास पाटील यांचे निवासस्थानाकडे प्रयाण करतील. दुपारी तीन ते पावणेचार दरम्यान अमळनेर येथील पोलिस अधिकारी व कर्मचारी निवासस्थानांचे पालकमंत्री गुलाबराव पाटील व सन्मानीय लोकप्रतिनिधीच्या उपस्थितीत उद्घाटन कार्यक्रमास ते उपस्थिती देणार आहेत. दुपारी साडेतीन वाजता अमळनेर नगरपरीषद येथील जिजाऊ महिला व्यायाम शाळा व सवित्रीबाई फुले अभ्यासिकेचे उद्घाटन झाल्यानंतर हेलिपॅडवरून सव्वाचार वाजता ते मुंबईकडे प्रयाण करतील.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !