भुसावळचे नगरसेवक पिंटू कोठारी यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
दातृत्वाचा धनी : कोरोना महामारीत जनसेवसाठी अहोरात्र घेतले परीश्रम
भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात तब्बल एक हजार 200 लोकांना होमकॉरंटाईन होण्यासाठी केलेली मदत तसेच गरजूंना धान्य वाटप, दवाखान्यात दाखल करण्यासह मृतांवर अंत्यसंस्कार करण्यापासून तर त्यांच्या कुटुंबियांना धीर देण्यात महत्वाची भूमिका बजावणार्या नगरसेवक पिंटू कोठारी यांचा भुसावळातील भाजपाच्या बैठकीत कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला. गुरुवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात रात्री आठ वाजता भाजपा पदाधिकार्यांची बैठक झाली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नगरसेवक पिंटू कोठारी व नगरसेवक युवराज लोणारी यांचा सन्मान करण्यात आला.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, बेटी बचावो बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, संघटन सरचिटणीस अॅड.किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सरचिटणीस विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शैलजा शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.

