भुसावळचे नगरसेवक युवराज लोणारी यांचा कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मान
भुसावळ : कोरोना महामारीच्या काळात जनसेवेसाठी अहोरात्र धडपड करणार्या भाजपा नगरसेवक युवराज लोणारी यांचा भाजपा पदाधिकार्यांनी कोरोना योद्धा पुरस्कार देवून सन्मान केला. गुरुवारी लोणारी समाज मंगल कार्यालयात रात्री आठ वाजता भाजपा पदाधिकार्यांची बैठक झाली. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते नगरसेवक युवराज लोणारी यांचा सन्मान करण्यात आला. लोणारी यांनी कोरोनाच्या काळात प्रभागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूंसह धान्य वाटप केले होते शिवाय कोरोनाबाबत जनजागृती केली होती तसेच दोन महिने लोणारी हॉलही प्रशासनाला उपलब्ध करून दिला होता व या कार्याची दखल घेवून त्यांना गौरवण्यात आले.
यांची व्यासपीठावर उपस्थिती
व्यासपीठावर प्रदेश संघटन सरचिटणीस विजय पुराणीक, विभागीय संघटनमंत्री रविंद्र अनासपुरे, बेटी बचावो बेटी पढाव अभियानाचे राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके, संघटन सरचिटणीस अॅड.किशोर काळकर, खासदार रक्षा खडसे, आमदार संजय सावकारे, सरचिटणीस विजय धांडे, वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे, तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील, शैलजा शेळके आदी पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.प्रशांत पाटील यांनी केले.

