ओबीसी आरक्षणबाबत माजी मंत्री एकनाथराव खडसेंना निवेदन
वरणगाव : ओबीसीत विविध घटकांतील समाजाला न्याय मिळावा या उद्देशाने महाराष्ट्र माळी समाज महासंघ जळगांव जिल्हा तसेच समता परीषद जळगाव जिल्हा व खान्देश माळी समाज महासंघ यांच्यावतीने शुक्रवारी राज्याचे माजी महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांना निवेदन देण्यात आले. पदाधिकार्यांनी खडसे यांची मुक्ताईनगर येथील निवासस्थानी खडसे यांची सदिच्छा भेट घेत निवेदन दिले.
यांची होती उपस्थिती
यावेळी महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष शालिग्राम ओंकार मालकर, समता परीषद जिल्हाध्यक्ष सतीश महाजन, खानदेश माळी महासंघाचे प्रदेश्याध्यक्ष प्रकाश महाजन, मुक्ताईनगर माजी सभापती राजेंद्र माळी, महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा वरणगाव राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संतोष माळी, प्रशांत महाजन, राष्ट्रीय फुले ब्रिगेड प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र , चाळीसगाव समता परीषद शहराध्यक्ष शांताराम चौधरी, नारायण महाजन, गुलाबराव सोनवणे, किरण महाजन, सचिन माळी उपस्थित होते. यावेळी ओबीसींच्या विषयावर खडसे यांच्यासोबत विस्तृत चर्चा झाली तसेच आगामी नियोजन करण्यात आले.

