शिवपूर कन्हाळ्यात गावठी दारू भट्टीवर धाड


भुसावळ : तालुक्यातील शिवपूर कन्हाळा शिवारातील नाल्याजवळ तालुका पोलिसांनी धाड टाकत जुम्मा छट्टू गवळी (रा.कन्हाळा) याच्या ताब्यातून गावठी हातभट्टीची 25 लीटर तयार दारूसह एक हजार 100 लिटर रसायन नष्ट करण्यात आले. एकूण 38 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल जपत करण्यात आला व आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई तालुक्याचे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, हवालदार विठ्ठल फुसे, गणेश राठोड, विनोद पाटील, रीयाज काझी, जगदीश पाटील, पंकज सपकाळे आदींनी केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !