भुसावळात अल्पवयीन मुलीचा विनयभंग


भुसावळ : शहरातील नाहाटा कॉलेजमागील एका अपार्टमेंटमध्ये राहात असलेल्या 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना गुरूवारी दुपारी घडली. या प्रकरणी किरण (रा.द्वारकानगर, भुसावळ) या युवकाविरुद्ध बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन मुलगी घरी एकटीच असताना आरोपीने प्रेम संबंध ठेवण्यासाठी आग्रह धरत लज्जा निर्माण होईल, असे वर्तन केले व मुलीने आरडा-ओरड केल्यानंतर आरोपीने पळ काढला. मुलीची आई घरी आल्यानंतर तिने मुलगी रडत असल्याचे कारण विचारल्यानंतर ही घटना समोर आली व त्यानंतर आरोपी मुलगा दिसल्यावर त्यान मुलीला उचलून घेऊन जाईल व तिला मारेल अशी धमकी दिल्याचा आरोप आहे. तपास पोलिस निरीक्षक दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !