मुक्ताई कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ
जळगाव जिल्ह्यातील प्रस्तावीत अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार : माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे
मुक्ताईनगर : संत मुक्ताई शुगर अॅण्ड एनर्जी मुक्ताईनगर या साखर कारखान्याचा सातवा बॉयलर अग्नीप्रदीपन व गळीत हंगाम 2020-21 चा शुभारंभ कारखाना कार्यस्थळावर शुक्रवारी झाला. माजी मंत्री एकनाथराव खडसे साहेब व मंदाताई खडसे यांच्या शुभहस्ते तर बॉयलर अग्नीप्रदीपन करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास जळगांव जिल्हा सहकारी बँकेच्या चेअरमन अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर, कारखान्याचे चेअरमन शिवाजीराव भगवानराव जाधव, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी,, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अॅड.रवींद्र भैय्या पाटील, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीप पाटील, माजी आमदार कैलास बापू पाटील, नगराध्यक्षा नजमा तडवी, विनोद तराळ आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जि.प.सदस्य कैलास सरोदे, निलेश पाटील, वैशाली तायडे, वनिता गवळे, बोदवड पंचायत समिती सभापती किशोर गायकवाड, पंचायत समिती सदस्य राजेंद्र सावळे, विनोद पाटील, प्रदीप साळुंखे, गणेश पाटील, ईश्वर राहणे, विधानसभा क्षेत्रप्रमुख विजय सोनार, तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, साहेबराव सिंगतकर, विशाल खोले महाराज, शाहीद खान, किशोर चौधरी, वसंत पाटील, कल्याण पाटील, देवेंद्र खेवलकर, आबा माळी, दीपक झांबड, प्रमोद धामोळे, रामदास पाटील, मधुकर राणे, कैलास चौधरी, विनोद कोळी, सईद बागवान, अशोक लाडवंजारी, सुनील माळी, हाजी मुन्ना तेली, विलास धायडे, दशरथ कांडेलकर, शिवाजी पाटील, रामभाऊ पाटील, राजू माळी, विश्वनाथ चौधरी, बी.सी.महाजन, योगेश कोलते, पांडुरंग नाफडे आदी उपस्थित होते.
भाजपाला लवकरच भगदाड : रवींद्र पाटील
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले नाथाभाऊ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याबद्दल मी सर्व प्रथम त्यांचं स्वागत, अभिनंदन करतो. मुक्ताई साखर कारखाना हा गेल्या सहा वर्षांपासून नाथाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरळीत सुरू असून नेहमी एफ.आर.पी.पेक्षा जास्त भाव देऊन तत्काळ उसाचे पेमेंट अदा करतो त्याबद्दल चेअरमन शिवाजी जाधव, व्हा चेअरमन रोहिणी खडसे यांचे मी अभिनंदन करतो. नाथाभाऊ यांनी पक्षांतर केल्यामुळे भाजप प्रत्येक तालुक्यात बैठका घेत आहेत परंतु मोजकेच कार्यकर्ते भाजपमध्ये राहिले असल्या कारणाने उपस्थितांपेक्षा स्टेजचेच फोटो टाकले जात आहेत. भाजपच्या बैठकीत जेवढे कार्यकर्ते उपस्थित नसतात त्यापेक्षा जास्त नाथाभाऊ यांच्या घरी दररोज कार्यकर्ते नाथाभाऊ यांचे अभिनंदन करण्यासाठी असतात, असे सांगत ते म्हणाले की, भाजपा नेते खडसे गेल्यामुळे फरक पडणार नसल्याचे सांगत असलेतरी लवकरच भगदाड पडलेले दिसेल, असेही ते म्हणाले.
मतदारसंघात सुरू केलेल्या उपसा सिंचन योजना नाथाभाऊ यांनी पाठपुरावा करून पूर्णत्वास न्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केले.
अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न : खडसे
माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, आता पदाची अपेक्षा नसून मी मतदारसंघात, जिल्ह्यात सुरू केलेले आणि प्रस्तावित केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी पक्षांतर केले आहे. ते पूर्ण करण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेल. कारखान्यात 12 मेगावॅट क्षमतेचा वीज प्रकल्प असून कारखान्याची गरज भागवून ती वीज कंपनीला पुरवली जाते. यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने चार लाख मेट्रीक टन ऊस गाळपाचे उद्दीष्ट आहे. गळीत हंगाम शुभारंभानंतर लगेच कारखाना गाळपास प्रत्यक्ष सुरवात होईल शिवाय यंदा उसाला दोन हजार 234 रुपये भाव देण्याचे निश्चित केल्याचे ते म्हणाले. यशस्वीतेसाठी देवरे, रवी भोसले, पंकज पाटील आदींनी परीश्रम घेतले.

