जुनोन्यात मारहाणीत तिघे जखमी : दहा जणांविरुद्ध गुन्हा


बोदवड : तालुक्यातील जुनोना गावाजवळील फरकांडा येथील नदी काठावर दहाव्याच्या कार्यक्रमात कानशीलात मारल्यावरून वाद उफाळल्यानंतर तुंबळ हाणामारी झाली व या घटनेत तिघे जखमी झाले. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सीताबाई अशोक पवार (35, जुनोना) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचे पती अशोक ओंकार पवार यांचे निधन झाल्यानंतर गुरुवारी दुपारी दिड वाजता दहाव्याचा कार्यक्रम फरकांडा येथील नदीवर सुरू असतना त्यांच्या आई बिजलाबाई यांच्यावर तक्रारदार दीर लहू ओंकार पवार (पिंपळगाव, ता.भुसावळ) याने कानशिलात मारल्याने वाद उद्भवला व दहा आरोपींनी फिर्यादीसह त्यांचे मेहुणे माधव भगवान पवार व देवराव भगवान पवार (जामनेर) यांना लाथा-बुक्क्यांनी तसेच फायटरने मारहाण केली. या प्रकरणी आरोपी लहू ओंकार पवार, हर्षल लहू पवार, चेतन लहू पवार (तिघे रा.पिंपळगाव), प्रकाश रमेश पवार व विकास रमेश पवार (दोन्ही रा.निंभोरा स्टेशन, ता.रावेर), अमोल शामराव चव्हाण, सागर शामराव चव्हाण, उषाबाई गोलू पवार (तिघे रा.निमखेडी, ता.मुक्ताईनगर), मिराबाई राजू सोनवणे (जुनोना, ता.बोदवड), आशाबाई समाधान पवार (खिरोदा, ता.रावेर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक बळीराम हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार वसंत निकम करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !