जीवन अनुभूतीसाठी प्रत्येकाने नर्मदा परीक्रमा अनुभवावी


डॉ.प्रशांतचंद्र पाटील : रोटरी क्लब व इनरव्हिल क्लबतर्फे आयोजित कार्यक्रमादरम्यान साधला संवाद

चाळीसगाव : समाज जीवन, मानवी स्वभाव, अध्यात्म आणि या सर्व विषयांशी संबंधित पैलूंना अत्यंत समर्थपणे हात घालण्यासाठी नर्मदा परीक्रमा प्रत्येकाने अनुभवावी. आजवर वसुधैव कुटूंबकम या संकल्पनेविषयी फक्त ऐकलं वाचलं होतं पण त्याचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा असेल तर त्यासाठी नर्मदा परीक्रमा प्रत्यक्ष अनुभवायला हवी, असे प्रतिपादन डॉ.प्रशांतचंद्र पाटील यांनी केले. तेरोटरी क्लब ऑफ चाळीसगाव व इनरव्हील क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’नर्मदा किनारी, सायकल स्वारी’ या विषयावरील ऑनलाईन चर्चेसत्रादरम्यान बोलत होते.

ऑनलाईनच्या माध्यमातून हितगुज साधले
नर्मदा परीक्रमा ही एक समृद्ध, संपन्न अशी अनुभवगाथा असून निसर्गाची विविध रुपे पाहताना अनंताच दर्शनच घेण्याचा योग आला. निसर्गाच्या विविध बाबींचं सौंदर्य सहज शब्दांत रेखाटलेलं आहे. नर्मदा परिक्रमेविषयक डॉ. प्रशांत यांनी केलेल्या सायकल भ्रमणातील काही ठळक वैशिष्ट्यपुर्ण नोंदी कथन केल्यात. नर्मदा परिक्रमेचा अनुभव त्यांनी केलेल्या हितगुजाच्या स्वरुपात मांडला. नर्मदा परिक्रमा करत असताना लाखो वर्षांची परंपरा असलेली नर्मदा खोर्‍यातील संस्कृती, वैविध्यपूर्ण अशी जैविक संपदा याविषयी आपली निरीक्षणे यावेळी सांगितलीत. नर्मदा खोर्‍यातील लोकजीवन, नर्मदेवरची धरणं, विस्थापितांचे पुनवर्सन याबाबत ही डॉ प्रशांतचंद्र यांनी जाणून घेण्याचा कसा प्रयत्न केला याची संपूर्ण माहीती यावेळी दिली. नर्मदा परिक्रमेच्या निमित्ताने सुरू झालेली अंतर्यात्रा ही निसर्गाविषयक अन माणसाबद्दल निरपेक्ष प्रेम , सेवा करायला शिकवते तसेच व्यक्ती आणि वल्लीमध्ये ही तेवढ्याच प्रकर्षाने जाणवते , असे सांगत त्यांनी ऑनलाईनच्या माध्यमातून हितगुज साधले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस रोटरी क्लबचे अध्यक्ष नितीन पाटील व इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा डॉ चेतना कोतकर यांनी आपल्या क्लबच्या उपक्रमांची माहिती सादर केली तर रोटे शशिकांत धामणे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परीचय करुन देत क्लब अंर्तगत राबविण्यात येणार्‍या अनेकविध उपक्रमांची माहीती विशद केली. रोटे विजय गर्गे यांनी प्रास्ताविक तर आभार सचिव प्रवीण बागड यांनी मानले.

यांनी नोंदवला चर्चेत सहभाग
याप्रसंगी डॉ.सुनील राजपूत, समकित छाजेड, संजय चौधरी, कांतीलाल पटेल, हिम्मत पटेल, प्रदीप भांडारकर, हरीष पल्लण, बलदेव पुन्शी, भरत मेहता, संजय अग्रावत, रविंद्र निकम, भास्कर पाटील, गणेश बागड, स्वप्निल कोतकर, कल्पना धामणे, जुलेखा शुक्ल, लिलावती जगताप, अनघा अग्रवाल, सुरेखा चव्हाण, लाजवंती वासवानी, संगिता नागदेव आदी रोटेरियन्स व इनरव्हील क्लबच्या सदस्यांनी चर्चेत सहभाग घेत प्रश्नोत्तराच्या माध्यमातून संवाद साधला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !