सेंट्रींग साहित्य लांबवणार्‍या कानसवाडासह जळगावातील तिघे जाळ्यात


जळगाव स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई : चार लाख आठ हजारांचे साहित्य जप्त

जळगाव : चाळीसगावातील के.के.मूस बंगल्याशेजारील शेडमधून सेंट्रींग साहित्याची चोरी झाल्याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात गुरनं.285/2019 भादवि कलम 380 प्रमाणे गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू असताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्ह्यातील कानसवाडासह जळगावातील तिघा आरोपींच्या मुसक्या आवळल्या असून आरोपींच्या ताब्यातून चार लाख आठ हजारांचे सेंट्रींगचे साहित्य व ट्रक जप्त केला आहे. आरोपींना चाळीसगाव शहर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

गोपनीय माहितीवरून आवळल्या मुसक्या
जळगावच्या शिवारात नगरात आरोपींसह मुद्देमाल असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरून जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी आरोपींच्या मुसक्या आवळल्या. या प्रकरणी दीपक छगन कोळी (25, रा.कानसवाडा, जि.जळगाव), शेखर वासुदेव कोळी (21, रा.कानसवाडा, जि.जळगाव) व गाडी चालक मजीद खान बिसमील्ला खान (45, रा.शिवाजी नगर, जळगाव) यास अटक करण्यात आली. आरोपींच्या ताब्यातून चार लाख आठ हजार रुपये किंमतीचा सेंट्रींग सामान तसेच टाटा 407 वाहन जप्त करण्यात आले.

यांच्या पथकाने आवळल्या आरोपींच्या मुसक्या
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले, अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके, अपर पोलिस अधीक्षक सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापू रोहम यांच्या नेतृत्वात हवालदार अनिल जाधव, रवींद्र पाटील, सुधाकर अंभोरे, विलास पाटील, दादाभाऊ पाटील, महेश पाटील, अशोक पाटील, अशोक महाजन यांच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.


कॉपी करू नका.