सिकंदराबाद हिसार व हैदराबाद जयपूर या दरम्यान विशेष गाडी


भुसावळ : रेल्वे प्रशासनातर्फे सिकंदराबाद हिसार आणि हैदराबाद जयपूर या दरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यायत आला आहे. ही गाडी संपूर्णतः आरक्षित असून कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाडीत प्रवेश देण्यात येणार आहे.

सिकंदराबाद हिसार विशेष गाडी
अप 02789 सिकंदराबाद हिसार विशेष गाडी 8 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी व बुधवारी प्रस्थान स्टेशनपासून 11.35 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी हिसार स्टेशनला 6.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, अमळनेर, दोंडाईचा, नंदुरबार, सुरत, वडोदरा, अहमदाबाद, मैसाना, पालनपूर, आबूरोड, मारवार, पालीमारवाड, जोधपूर, मेरता रोड, नागोर, नोखा, बिकानेर, श्री दुंगर्गड, रतनगड,चुरू, सदुलपुर येथे थांबा देण्यात आला आहे. डाऊन 02790 हिसार-सिकंदराबाद विशेष गाडी 11 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शुक्रवारी व रविवारी प्रस्थान स्टेशनपासून 12.50 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी सिकंदराबाद स्टेशनला 8.45 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा, चंद्रपूर, बल्लारशाह, शिरपूर कागज नगर, काजीपेट स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

हैदराबाद-जयपूर विशेष गाडी
डाऊन 07020 हैदराबाद-जयपूर विशेष गाडी 5 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर शनिवारी प्रस्थान स्टेशनपासून 3.10 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी जयपूर स्टेशनला 5.25 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला मनमाड, जळगाव, भुसावळ, बर्‍हाणपूर, खंडवा, हरदा, इटारसी, भोपाळ, उज्जैन, नागदा, रतलाम, मंदसौर, नीमच, चित्तोत्तगड, भिल्वारा विजयनगर, अजमेर, किसनगड, फुलेरा स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 07019 जयपूर-हैदराबाद विशेष गाडी 08 डिसेंबरपासून पुढील आदेशापर्यंत दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनपासून 3.20 वाजता रवाना होईल आणि तिसर्‍या दिवशी हैदराबाद स्टेशनला 7.30 वाजता पोहोचणार आहे.
या गाडीला खंडवा, बर्‍हाणपूर, भुसावळ, जळगाव, मनमाड, नागरसोल, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, बासर, निजामाबाद, कामारेड्डी, मेडचल, सिकंदराबाद स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. दरम्यान, केवळ आरक्षित व कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये प्रवासाची परवानगी देण्यात आली असून कोविड नियमांचे प्रवाशांना पालन करावे लागणार आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !