भागलपूर, छपरा, दानापूरसह मुजफ्फरपुर विशेष गाडीच्या वेळेत बदल
भुसावळ : सुरत-भागलपूर, सुरत-छपरा, उधना-दानापूर विशेष गाडी तसेच बलसाड-मुजफ्फरपूर आदी विशेष गाड्यांच्या वेळेत बदल करण्यात आला असून रेल्वे प्रवाशांनी बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रवाशांनी केले आहे. ही गाडी संपूर्णपणे आरक्षित असून केवळ कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच या गाडीत प्रवेश दिला जाणार आहे शिवाय प्रवाशांना कोविड 19 नियमांचे पालन करावे लागणार आहे.
सुरत-भागलपुूर विशेष गाडी
डाऊन 09147 सुरत-भागलपूर एक्स्प्रेस दर मंगळवारी व शनिवारी प्रस्थान स्टेशनहुन 10.10 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी भागलपूरला स्टेशन 7 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर व खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 09148 भागलपूर-सुरत गाडी 3 डिसेंबरपासून दर गुरुवारी व सोमवारी प्रस्थान स्टेशनहुन 6.45 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सुरतला 4.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, बर्हाणपूर, भुसावळ-व जळगाव स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
सुरत-छपरा विशेष गाडी
डाऊन 09045 सुरत-छपरा गाडी 2 डिसेंबरपासून प्रस्थान स्टेशनहुन 10.10 वाजता प्रस्थान केल्यानंतर दुसर्या दिवशी छपरा स्टेशनवर 6.35 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, बर्हाणपूर, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 09046 छपरा-सुरत गाडी 4 डिसेंबरपासून प्रस्थान स्टेशनहून 9.00 वाजता सुटल्यानंतर दुसर्या दिवशी सुरतला 4.10 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, बर्हाणपूर, रावेर, भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
उधना-दानापूर विशेष गाडी
डाऊन 09063 उधना-दानापूर गाडी 01 डिसेंबरपासून दर मंगळवारी प्रस्थान स्टेशनहुन 8.35 वाजता प्रस्थान करणार असून दुसर्या दिवशी दानापूरला 12 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ, खंडवा रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 09064 दानापूर-उधना गाडी 2 डिसेंबरपासून दर बुधवारी प्रस्थान स्टेशनहुन 4.40 वाजता प्रस्थान करणार असून दुसर्या दिवशी उधना येथे 9.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला खंडवा, भुसावळ व जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.
बलसाड-मुजफ्फरपूर विशेष गाडी
डाऊन 09051 बलसाड-मुजफ्फरपूर गाडी 5 डिसेंबरपासून प्रस्थान स्टेशनहुन 10.20 वाजता प्रस्थान करणार असून दुसर्या दिवशी मुजफ्फरपूर स्टेशनवर 6.05 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला जळगाव, भुसावळ रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. अप 09052 मुजफ्फरपूर-बलसाड गाडी 7 डिसेंबरपासून प्रस्थान स्टेशनहुन 8.10 वाजता प्रस्थान करणार असून तिसर्या दिवशी उधना येथे 1.40 वाजता पोहोचणार आहे. या गाडीला भुसावळ, जळगाव रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे.

