स्पर्धा परीक्षेत यश मिळवणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन माना
अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर : वाढदिवसानिमित्त निमखेडीतील वाचनालयास स्पर्धा परीक्षांची पुस्तके भेट
मुक्ताईनगर : सध्या स्पर्धेचे युग असून ग्रामीण भागातील तरूण मोठया प्रमाणात स्पर्धा परीक्षेेला बसतात परंतु पुस्तक महागडी असल्याने त्यांना ती खरेदी करणे शक्य नसते. अशा वेळी गावातील ग्रंथालयात पुस्तके उपलब्ध करून दिल्यामुळे युवकांचा ओढा ग्रंथालयाकडे वळेल व त्याचा गरीब मुलांना फायदा होईल व उद्याचे अधिकारी घडून आपल्या परीसराचा लौकिक वाढेल, असा आशावाद जिल्हा बँक अध्यक्षा अॅड.रोहिणी खडसे-खेवलकर यांनी व्यक्त केला. अॅड.खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील निमखेडी खुर्द केक कापण्यात आला तसेच वाढदिवसानिमित्त दीपक साळुंखे यांच्या तर्फे स्वामी विवेकानंद वाचनालयास स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरणारे पुस्तके भेट म्हणून देण्यात आली.
यांची होती उपस्थिती
अध्यक्षस्थानी जळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील होते. पंचायत समिती सभापती प्रल्हाद जंगले, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील, जिल्हा सरचिटणीस ईश्वर रहाणे, जिल्हा परीषद सदस्य निलेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
विद्याथ्यार्थ्यांना होणार फायदा : अॅड.पाटील
जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील म्हणाले, अॅड.रोहिणी खडसे यांच्या वाढदिवसानिमित्त निमखेडीमधील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त अशा पुस्तकांची उपलब्धता होत आहे. याचा स्पर्धा परीक्षेची तयारी करणार्या विद्यार्थ्यांना निश्चितच फायदा होईल.
स्पर्धेशिवाय यश नाही : अॅड.खडसे
अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, सध्याची जगाची वाटचाल स्पर्धात्मक आहे. सारं जग स्पर्धेच्या लयीने एकमेकांसोबत चाललेले आहे. प्रत्येक व्यक्ती प्रत्येकांशी स्पर्धा करण्यासाठी धजावलेला आहे जणु स्पर्धा परीक्षा हाच त्यांच्या जीवनाचा मार्ग आहे की काय असे वाटायला लागले आहे. स्पर्धा परीक्षा ही आजच्या काळाची गरज आहे. असे म्हणणे वावगे ठरणार नाही कारण स्पर्धा केल्याशिवाय यशदेखील मिळणार नाही. परंतु स्पर्धा करीत असतांना सामाजीक हिताचादेखील विचार करायला पाहिजे. स्पर्धा परीक्षेत यश मिळविणे हे अंतिम ध्येय न मानता ते सामाजिक सेवेचे साधन मानले पाहिजे.
यांची होती उपस्थिती
प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष यु.डी.पाटील, संदीप रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य सुवर्णा साळुंके, राष्ट्रवादी महिला आघाडी तालुकाध्यक्ष लता सावकारे, रामभाऊ पाटील, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शहीद खान प्रमोद सोनवणे, संजय कोळी, शिवराज पाटील, निलेश मालवेकर, शिवा पाटील, दीपक साळुंके, सुमित बर्हाटे, पांडुरंग नाफडे यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन शिवाजी मगर व आभार सोपान दुट्टे यांनी मानले. दीपशिखा फाउंडेशन आणि स्वामी विवेकानंद वाचनालयाचे अध्यक्ष अभिमन घोगरे आणि सहकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

