बस स्थानक भागातून अल्पवयीन तरुणीचे अपहरण


चारचाकीतून अपहरण करीत मध्यप्रदेशाच्या दिशेने अपहरणकर्त्यांनी काढला पळ

शिरपूर : शहरातील मांडळ रोडवरील अल्पवयीन तरुणी कुटुंबासह बाहेरगावी जाण्यासाठी बस स्थानकाजवळ उभी असताना तिचे अपहरण झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 12.30 वाजेच्या सुमारास घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या काकूंच्या फिर्यादीवरून शहर पोलि ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. पीडीतेचे वय 16 वर्ष असून तिचे वडील मयत झाले आहेत.

रीक्षातून उतरताच केले अपहरण
अल्पवयीन तरणी आपल्या आई व भावंडासह शहरातील एका भागात राहते. ती आई, काका व काकुसह बाहेर गावी नातेवाईकांकडे धार्मिक कार्यक्रसाठी घरून निघाली होती. बसला उशीर असल्याने बस स्थानकाबाहेर खाजगी अ‍ॅपे रीक्षात बसलेली असतांना मळमळ आल्याने ीक्षातून खाली उतरली परंतु अधिक वेळ झाल्याने मुलगी दिसून आली नाही म्हणून आईसह नातेवाईकांनी शोध घेतला असता एम.एच.12 पासिंग असलेली स्वीप्ट डिझायनर गाडीतून आलेल्या तरुणांनी तरुणीला ओढत नेल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी तरुणाने दिल्यावरून पीडित मुलीच्या काकूने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली त्यावरून शहर पोलिस ठाण्यात अल्पवयीन तरुणीचे अपहरण करणार्‍या दोन अज्ञात तरुणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तत्काळ वाहनाचे लोकेशन वरून तपास केला असता सदर वाहन राज्य सीमा ओलांडून मध्यप्रदेशात दिसून येत असल्याने पोलिस पथक रवाना झाल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !