गांजासह 8 लाख 70 हजारांचा मुद्देमाल जप्त
मध्यप्रदेशातील दोन गांजा तस्कर पोलिसांच्या ताब्यात
शिरपूर : महाराष्ट्रातून गांजाची अवैध वाहतूक करणाऱ्या मध्यप्रदेश राज्यातील दोन तस्करांना ताब्यात घेत ८ लाख ७० हजाराचा मुद्देमाल जप्त केल्याची कार्यवाही तालुका पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी ३१ डिसेंम्बर रोजी तालुक्यातील सुळे भोईटी रस्त्यावर केली. तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना तालुक्यातुन सुळे भोईटी रस्त्यावरून सफेद रंगाच्या बोलेरोमधून अवैध गांजाची वाहतूक होत असल्याच्या गोपनीय माहितीवरून सुळे भोईटी रस्त्यावर ३१ डिसेंबर २०२० रोजी दुपारी सापळा रचण्यात आला होता. या कार्यवाहीत एक पांढरी रंगाची गोणीत १ लाख ६३ हजार रूपये किमतीचा १६ किलो वजनाचा सुका गाजा व ७ लाख रुपये किमतीची सफेद रंगाची बोलेरो कार क्रमांक एमपी-१३ सी.सी.८५७३ आणि ७ हजार रुपये किंमतीचा एक मोबाईल असा
८ लाख ७० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी संजीव जाधव यांनी तालुका पोलीस ठाण्यात गाडी चालक रविकुमार याबुलालजी सोनपरख (४२, रा.ध.नं. ४०४ ढाचा भवर नागररोड, उज्जैन) व नितेश किशोर ठाकुर (३०, रा.प.नं. १७१ लिखोदे रोड इंदोर) यांच्या विरुद्ध गुरंन ९८/२०२० एन.डी. पी.एस.कायदा कलम २० व २२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पुढील तपास दीपक वारे करीत आहे सदर कार्यवाही तालुका पोलीस ठाण्याचे पोलिसांनी केली.

