शिरपूर वरवाडे नगरपरीषदेच्या आवारातून दुचाकी लंपास


चोरट्यांची फिरविली नजर शासकीय कार्यालयाकडे

शिरपूर : शिरपूर वरवाडे नगर परीषदेच्या आवारात उभी केलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. नगरपालिका कर्मचारी रोहन ब्रिजलाल माळी यांनी आपली (एम.एच.१८ ए.इ. ९४६५) ही क्रमांकाची काळ्या रंगाची स्प्लेडर दुचाकी सकाळी ९.३० वाजेच्या दरम्यान नेहमीप्रमाणे नगरपालिका कार्यालयाच्या आवारात उभी करून कार्यालयात गेले होते. त्यानंतर १०:३० वाजेच्या बाहेर शासकीय कामकाज निमित्ताने निघाले असता त्यांना सदर जागेवर दुचाकी आढळून आली नाही. सर्वत्र शोध घेऊन ती मिळून न आल्याने रोहन ब्रिजलाल माळी (१९ , रा.महात्मा फुले चौक, वरवाडे शिवार, ता.शिरपूर, जि.धुळे) यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !