कत्तलीच्या इराद्याने गोवंशाची वाहतूक : 32 जनावरांची सुटका


शिरपूर : राष्ट्रीय महामार्गावर शिरपूर शहर पोलिसांनी मंगळवार, 5 जानेवारी रोजी सकाळी 7.30 वाजे दरम्यान धडक कार्यवाही करीत कत्तलीसाठी जाणार्‍या 32 गोवंश जनावरांची सुटका केली तर पोलिसांना पाहताच कंटेनर चालक पसार झाला. मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर इंदूर कडुन धुळ्याकडे एका कंटेनरमध्ये अवैधरित्या गुरांची वाहतूक केली जात असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाल्यानंतर सापळा रचण्यात आला होता.

32 गोवंशाची सुटका
पोलिस पथकाने 5 रोजी सकाळी 7.30 वाजेदरम्यान शिरपूर टोल नाक्यावर सापळा लावला. पोलिसांनी कंटेनर क्रमांक (आर.जे.06 जी.ए. 9175) च्या समोर पोलिस वाहन लावून अडविले असता चालक व सहचालक अंधाराचा फायदा घेत पसार झाले तर थांबविलेल्या कंटेनर ची तपासणी केली असता गाडीत 4 ते 8 वर्षीय 32 गोवंशाची कत्तलीच्या उद्देशाने वाहतूक करताना आढळून आले. पोलिसांनी 32 गोवंशची सुटका करीत खर्दे येथील गोशाळेत गुरे देखभालीसाठी रवाना केली तर या कारवाईत एक लाख 84 हजार रुपये किंमतीचे 32 गोवंश जनावरांसह 8 लाख रुपये किमतीचे कंटेनर असा 9 लाख 84 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. महेंद्र सपकाळ यांनी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावरुन अज्ञात कंटेनर चालक व सहचालकाविरुद्ध विरुद्ध प्राणी अधिनियम व मोटार वाहन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलिस अधीक्षक चिन्मय पंडित, अपर पोलिस अधीक्षक प्रशांत बच्छाव, उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल माने व पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एन.बी.सोनवणे, रामकृष्ण मोरे, महेंद्र सपकाळ, हेमंत पाटील, व्ही.एन.लोंढे व आर.एम.महाले यांच्या पथकाने केली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !