नाशिकमध्ये भाजपाला धक्का ; दोघे दिग्गज नेते शिवसेनेत दाखल
नाशिक : माजी आमदार आणि भाजपाचे माजी प्रदेश उपाध्यक्ष वसंत गीते यांच्यासह सुनील बागुल यांनी भाजपाला रामराम करीत शुक्रवारी शिवसेनेत प्रवेश केला. नाशिक दौर्यावर असलेल्या शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांची या दोघांनी गुरूवारी रात्री उशिरा भेट घेतली होती तर शुक्रवारी सकाळी 11 वाजता खासदार राऊत यांच्या पत्रकार परीषदेत दोघे नेते उपस्थित होते.
