21 वर्षीय तरुणीची गळफास घेत आत्महत्या
शिरपूर : तालुक्यातील विखरण येथे माध्यमिक विद्यालयासमोरील रहिवासी असलेल्या 21 वर्षीय तरुणीने राहत्या घरात ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे 10 जानेवारी रोजी सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास उघडकीस आल्याने गावात खळबळ उडाली आहे. मयुरी धनराज पाटील असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मयुरी पाटील या तरुणीने 10 जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान घरात कोणीही नसतांना ओढणीने गळफास घेतला. ही घटना उघडकीस येताच मयुरीचे काका विनायक पाटील यांनी शिरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी 7.15 वाजता दाखल केले असता डॉ.अमोल जैन यांनी तपासणी करून मयत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथील वॉर्ड बॉय सावता माळी यांच्या खबरीवरून शहर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मयुरी पाटील ही विखरण येथील रहिवासी व ग्रामसेवक धनराज अभिमन्यु पाटील यांची कन्या असून शिरपूर शहरातील नामांकित शिक्षण संस्थेत बीसीएच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होती.ि तने आत्महत्या का केली हे अद्याप समजू शकले नाही.

