वरणगाव नगरपरीषद निवडणूक भाजपाने स्वबळावर लढावी


प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी : वरणगावात दिनदर्शिकेचे अनावरण

वरणगाव : वरणगाव नगरपरीषदेची निवडणूक स्वबळावर लढावी व सत्ता स्थापन करावी, असे आवाहन भाजपाचे भाजपा मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी येथे केले. मुक्ताईनगरहून नाशिककडे प्रवासाला निघाले असताना भंडारी यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्या संपर्क कार्यालयास भेट दिली. याप्रसंगी त्यांच्या उपस्थितीत दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी महेश जोशी व गिरीश नारखेडे उपस्थित होते.

स्वबळावर लढावी निवडणूक
प्रमुख कार्यकर्त्याशी चर्चा करताना भंडारी यांनी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी शहरात केलेल्या विकास कामाच्या जोरावर येणार्‍या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर व स्वबळावर पूर्ण ताकदीने निवडणूक लढवावी पुन्हा भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवा, असे आवाहन पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले. या प्रसंगी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी प्रदेश उपाध्यक्ष माधव भंडारी यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सुनील माळी, अल्लाउद्दीन शेठ, श्यामराव धनगर, आकाश निमकर, ज्ञानेश्वर भोई, मिलिंद भैसे, गोलू राणे, हितेश भंगाळे आदींसह भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.





मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !