भुसावळात इनरव्हील क्लबतर्फे विसावा बागेचे उद्घाटन
भुसावळ : भुसावळ इनरव्हील क्लब ऑफ भुसावळतर्फे शहरातील माऊली नगरात इनरव्हील विसावा बागेचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. याप्रसंगी रजनी संजय सावकारे, डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल लाठी, असो. सीसीसीसी डॉ.रश्मीजी शर्मा, क्लब अध्यक्ष शीतल भराडे, राखी भराडे, अनिता खंडेलवाल, नोयना टेकवाणी, मनीषा तायडे, नूतन फालक यांची उपस्थिती होती. वृक्षमित्र प्रमोद शुक्ला यांचे सहकार्य लाभले.
विविध कार्यक्रमांचे आयोजन
दुपारी रोटरी हॉलमध्ये अनेक कार्यक्रम झाले. गणेशवंदना एन्जल क्लबच्या सदस्य राधिका मंत्री, प्रेरणा मंडोरे, खुशबू भराडिया, खुषी मंत्री दिव्या भराडिया यांनी सादर केली. स्वागत गीत वीणा लाहोटी, शशीकला लाहोटी व राधीका लाहोटी यांनी सादर केले. या प्रसंगी डॉ.रश्मी शर्मा यांना ऑनर्ड अॅक्टीव मेंबर या सन्मानाने सन्मानीत करण्यात आले. क्लबच्या आधार स्तंभ रत्नकांता अग्रवाल यांचे मीनल मराठे यांच्याहस्ते स्वागत करण्यात आले.

विविध समाजोपयोगी कार्यक्रम
डिस्ट्रिक्ट चेअरमन मीनल, पीडीसी रत्नकांतजी आगरवाल, रश्मी शर्मा, शीतल भराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रेल्वे स्थानकावर दोन वेडींग मशीन देण्यात आल्या तसेच बाजारपेठ पोलिस स्टेशनमध्ये धूम्रपान विरोधी पोस्टर लावण्यात आले. मोहिनी हिला एज्युकेशन किट व मोबाईल देण्यात आला तसेच गरजू 15 विद्यार्थिनींना वह्या तसेच पेन्सील तसेच 15 गरजूंना स्वेटर वाटप करण्यात आले. प्लास्टिकचा वापर रोखण्यासाठी दोन हजार कापडी पिशव्या तयार करून वाटप करण्याचा संकल्प केला.
यांनी घेतले परीश्रम
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी कांचन जोशी, मनीषा तायडे, राखी भराडे, शशीकला लाहोटी, सुनंदा भारुडे, जयश्री दवे, क्लब सचिव रुचिका शर्मा, उपाध्यक्षा वंदीता पारे, माजी अध्यक्ष स्वाती देव, राजेश्री कात्यायनी, सविता शुक्ला, अलका भाटकर, क्लबचे सर्व सदस्यांनी परीश्रम घेतले.

