पक्षाने माझ्याकडे मंत्री पदाचा राजीनामा मागितला नाही : धनंजय मुंडे


मुंबई : पक्षाने माझ्याकडे मंत्रत्री पदाचा राजीनामा मागितलेला नाही. तसेच मी राजीनामा दिलेला नाही, अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी राजीनाम्याबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली आहे. एका महिलेने केलेल्या बलात्काराच्या आरोपांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील समाज कल्याणमंत्री धनंजय मुंडे हे अडचणीत आले आहेत. त्यातच धनंजय मुंडेंवरील आरोप हे गंभीर असल्याचे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी केल्याने धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पोलिस चौकशीनंतर निर्णय : जयंत पाटील
धनंजय मुंडे यांना ब्लॅकमेल केलं जात होतं. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत मात्र याबाबत पोलिस चौकशी सुरू आहे. आता पोलिस चौकशीचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे.



शरद पवार म्हणाले, निर्णय घेणार
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरुपाचे आहेत. त्यांनी याबद्दल मला माहिती दिली आहे. पण माझं याविषयी पक्षातल्या प्रमुख सहकार्‍यांशी बोलणं झालेलं नाही. त्यांच्याशी संवाद साधल्यावर, विचारविनियम झाल्यावर पक्ष मुंडे यांच्यासंदर्भात निर्णय घेईल, असे शरद पवार म्हणाले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !