जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारेंची मुख्य निवडणूक अधिकार्‍यांकडे तक्रार


विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून मतदार यादीतून नाव गायब केल्याचा आरोप

भुसावळ : जिल्हा परीषद सदस्य पल्लवी प्रमोद सावकारे यांचे मतदार यादीतून नाव गायब झाल्याचा प्रकार गुरुवारी उघडकीस आला होता. या गंभीर प्रकाराची दखल घेत सावकारे यांनी मुख्य निवडणूक अधिकार्‍यांसह जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व भुसावळ तहसीलदारांकडे तक्रार केली आहे. विशेष म्हणजे प्रारूप मतदार यादीत नाव असताना निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या मतदार यादीतून नाव गायब झाल्याने या प्रकारामागे प्रशासनाचा गलथानपणा आहे की विरोधकांनी प्रशासनाला हाताशी घेत माझे नाव गायब केले? असा आरोप पल्लवी सावकारे यांनी केला होता.

दोषींवर कारवाईची मागणी
सावकारे यांच्या तक्रारीनुसार, अंतिम प्रारूप यादीत आपले नाव असल्याची खात्री आपण केली मात्र याद्या प्रकाशीत करण्यामध्ये जाणूनबुजून नाव गायब करण्यात आल्याचा दावा सावकारे यांनी केला आहे या शिवाय ग्रुप ग्रामपंचायत वांजोळा येथील मिरगव्हाण येथील भिल्ल वस्तीतील विश्‍वनाथ कृष्णा भील, शांताराम कृष्णा भील, वैशाली विश्‍वनाथ भील, आरती लिलाधर भील यांच्या कुटुंबातील एकूण 15 सदस्यांची नावेदेखील मतदारयादीतून गायब झाल्याने या मतदारांनादेखील मतदानापासून वंचित रहावे लागल्याने या प्रकाराला जो कुणी दोषी असतील त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची मागणी पल्लवी सावकारे यांनी केली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !