नशिराबाद पोलिसांची गांजाविरोधात मोठी कारवाई ; 3.538 किलो गांजासह दोघे जाळ्यात
गांजा, दुचाकी व मोबाईलसह तब्बल दोन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त
नशिराबाद (गुरुवार, 3 सप्टेंबर 2026) : नशिराबाद पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक व जळगावातील आरोपींकडून तीन 538 किलो गांजा जप्त केला आहे. गांजासह मोटारसायकल आणि मोबाईल फोन मिळून एकूण दोन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
‘नशामुक्त भारत’ अभियानांतर्गत कारवाई
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘नशामुक्त भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात अमली पदार्थांची विक्री, वाहतूक व सेवन यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी गुप्त माहिती संकलित करून प्रभावी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नशिराबाद सहा.निरीक्षक योगीता नारखेडे यांना गांजा वाहतुकीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी कारवाईचे निर्देश दिले. , नशिराबाद गावातील साती बाजार चौकात दोन संशयीत अंमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करण्यासाठी आल्यानंतर पथकाने पडताळणी करीत दोन संशयीतांना ताब्यात घेतले. ही बुधवार, 2 सप्टेंबर 2026 रोजी रात्री करण्यात आली. अटकेतील आरोपींमध्ये राजेश भारत बांदू (31, महादेव मंदिराजवळ, तांबापुरा, जळगाव) व सुभाष सोमा मराठे (68 साती बाजार, नशिराबाद, जळगाव) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

दोन लाख 53 हजारांचा मुद्देमाल जप्त
आरोपीकंडून एक लाख रुपये किंमतीचा दोन किलो 908 ग्रॅम वजनाचा गांजा, 73 हजार 500 रुपये किंमतीचा एक किलो 430 ग्रॅम गांजा (अर्धवट सुकलेल्या काड्या व बिया असलेला) तसेच 70 हजार रुपये किमतीची होंडा कंपनीची शाईन (क्रमांक एम.एच.19 सी.डी.9574) व
10 हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण दोन लाख 53 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला व गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर करीत आहेत.
यांनी केली कारवाई
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित, अपर पोलीस अधीक्षक केदार बारबोले यांच्या मार्गदर्शनाखाली नशिराबाद पोलीस ठाण्याच्या प्रभारी योगिता नारखेडे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक प्रिया दातीर, हवालदार गुणवंत देशमुख, हवालदार चंद्रकांत पाटील, हवालदार प्रशांत विरणारे, हवालदार गिरीश शिंदे, हवालदार अनिल देशमुख, कॉन्स्टेबल भारत बाविस्कर, कॉन्स्टेबल पंकज सोनवणे, कॉन्स्टेबल प्रवीण लोहार, कॉन्स्टेबर सागर भिडे, कॉन्स्टेबल विठ्ठल मुंडे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

