नवापूर उपनगराध्यक्षपदी विश्वास बडोगे यांची बिनविरोध निवड
नवापूर : नवापूर नगर परीषदेच्या उपनगराध्यक्षपदी विश्वास भीमराव बडोगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. उपनगराध्यक्षपदासाठी विश्वास भीमराव बडोगे यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. मंगळवारी उपनगराध्यक्ष पदासाठी सकाळी 10 ते 12 वाजेच्या कालावधीत विश्वास भीमराव बडोगे यांचे एक नामनिर्देशनपत्र मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्याकडे दाखल करण्यात आले. विश्वास बडोगे यांच्या नामनिर्देशनपत्रावर सुचक म्हणून गटनेता आशिष फतु मावची व अनुमोदक म्हणून विरोध पक्षनेता नरेंद्र देविदास नगराळे यांची सही आहे.दुपारी बारा वाजता सभेला सुरुवात झाली.सभेत प्राप्त नामनिर्देशनपत्रांची छाननी करण्यात आली. छाननी अंती विश्वास भीमराव बडोगे यांची उपनगराध्यक्षपदासाठीचे नाम निर्देशन वैद्य असल्याचे पीठासन अधिकारी हेमलता पाटील यांनी जाहीर केले. नाम निर्देशन पत्र मागे घेण्यासाठी नियमानुसार पंधरा मिनिटांचा अवधी देण्यात आला असता. मुदतीत कोणीही माघार न घेतल्याने नियमानुसार उपनगराध्यक्षपदासाठी विश्वास बडोगे हे नवापूर नगरपरीषदेचे उपनगराध्यक्ष म्हणून पुढील कालावधीसाठी निवडून आल्याचे पीठासीन अधिकारी यांनी यावेळी जाहीर केले. सदरच्या विशेष सभेत उपस्थित असलेल्या सर्व सदस्यांचे आभार मानून सभा संपल्याचे पीठासन अधिकारी यांनी जाहीर केले.
यांची सभेला उपस्थिती
नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष आरीफ बलेसरिया यांनी दिनांक 11-1-2021 रोजी राजीनामा दिलेला होता. नवापूर नगर परीषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी पीठासन अधिकारी म्हणून हेमलता अजय पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी यांनी सभेस दिली होती त्यानुसार नवापूर नगर परीषदेच्या विर एकलव्य सभागृहात पीठासन अधिकारी हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुख्याधिकारी महेश चौधरी यांच्या उपस्थितीत सकाळी बारा वाजता विशेष सभेची सुरुवात करण्यात आली होती सभेच्या विशेष सभेत आशिष मावची, आरीफ बलेसरीया, नरेंद्र नगराळे, हारुण खाटीक, रेणुका गावीत, बबिता वसावे, मंजू गावीत, विशाल सांगळे, खलिल खाटीक, अरुणा पाटील, मीनल लोहार, महेंद्र दुसाणे, सुरैय्याबी शाह, महिमा गावीत, सुरेखा जगदाळे, बंटी चंदलाणी, यश अग्रवाल उपस्थित होते. मागील कार्यकाळात सत्ताधारी काँग्रेस ज्येष्ठ नेते सुरुपसिंग नाईक आणि विद्यमान आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वात सर्व समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करत सभापती पद असो की उपनगराध्यक्ष पद सर्वानुमते निवड होत आली आहे.


